पाकिस्तानी महिला नग्‍न होऊन करायची व्हिडीओ कॉल; जवान अडकला हनीट्रॅपमध्ये…

सिकर (राजस्थान) – येथील रहिवासी असलेला भारतीय लष्करातील जवान आकाश महरिया याला लष्कराची गोपनीय माहिती पाकिस्तानच्या महिला गुप्‍तहेराला पुरविल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आली आहे. पाकिस्तानी महिला नग्‍न होऊन त्याला व्हिडीओ कॉल करायची, त्याच्याशी अश्‍लील बोलायची आणि त्याच्याकडून गोपनीय माहिती मिळवायची, अशी धक्‍कादायक बाब तपासातून समोर आली आहे.

पाकिस्तानच्या हनी ट्रॅपमध्ये अडकलेला हा जवान सुट्टीवर आपल्या गावी आला होता. गावातून तो पाकिस्तानी महिला एजंटशी बोलला आणि भारतीय गुप्‍तचर यंत्रणांच्या ‘रडार’वर आला. त्याच्यावर नजर ठेवण्यात आली आणि अखेर त्याला अटक करण्यात आली. आधी फेसबुक, नंतर व्हॉटस् अ‍ॅप सन 2019 मध्ये आकाश आणि पाकिस्तानी महिला गुप्‍तहेराची फेसबुकवर मैत्री झाली.

नंतर ते व्हॉटस्अ‍ॅपवर परस्परांशी चॅटिंग करायला लागले. महिला त्याला भेटण्याचे आमिष देऊन त्याच्याकडून त्याच्या बटालियनची आणि लष्कराची इतर माहिती मिळवत होती. भारतीय गुप्‍तहेर यंत्रणा आधीपासूनच अशा जवानांवर नजर ठेवून होती. सिकर जिल्ह्यात एका नंबरवर पाकिस्तानातून कॉल आल्याचे कळताच हे प्रकरण उघडकीला आले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here