केरळमधील काँग्रेस नेते चाको राष्ट्रवादीत

नवी दिल्ली – केरळमधील काँग्रेसचे बडे नेते पी. सी. चाको यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. केरळ विधानसभा निवडणुकीत तिकिटवाटपावरून नाराज असलेले चाको यांनी १० मार्च रोजी सोनिया गांधी यांच्याकडे राजीनामा दिला होता.

चार वेळा खासदार राहिलेल्या चाको यांनी युवक काँग्रेसमधून राजकीय कारकीर्दीला प्रारंभ केला होता. मंगळवारी शरद पवार आणि अन्य नेत्यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश केला.

चाको यांनी स्थानिक नेतृत्वावर टीका करताना काँग्रेस दोन गटात विभागल्याचा आरोप केला. एका गटाचे नेतृत्व काँग्रेस तर दुसऱ्या गटाचे नेतृत्व डावे करत आहेत, असा आरोप केला होता. मागील वर्षी झालेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत चाको हे प्रभारी होते. या निवडणुकीत सपाटून मार पराभव झाल्यानंतर त्यांनी प्रभारीपदाचा राजीनामा दिला होता.

मंगळवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, प्रफुल्ल पटेल, खासदार श्रीनिवास पाटील यांच्यासह अन्य नेत्यांच्या उपस्थितीत चाको यांनी पक्षप्रवेश केला. यावेळी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना पवार म्हणाले, ‘आम्ही अन्य राज्यात सत्ता स्थापन करताना कॉमन मीनिमम प्रोग्रामनुसार आम्ही काम करतो. त्या त्या राज्यातील परिस्थिती पाहून आम्ही निर्णय घेतो.’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here