औरंगाबाद (प्रतिनिधी दत्तात्रय मोटे) – मध्यरात्री पेट्रोलिंग करत असताना पोलिसांच्या गाडीला शिरपूरजवळ अपघात झाला. या अपघातामध्ये सात जण जखमी झाले आहेत. त्यातील तिघांची प्रकृती गंभीर आहे. घटनेची माहिती कळताच शिवसैनिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना खाजगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
बीड पोलीस पेट्रोलिंग करत असताना मध्यरात्री पोलिसांच्या गाडीला बीडजवळ अपघात झाला. या अपघातामध्ये सात पोलीस जखमी झाले आहेत. एपीआय अशोक धांडे (57), हे.कॉ.राजेंद्र शिंदे (55), पोलीस चालक प्रताप घोडके (47), उमा उद्धव मोरे (40), लक्ष्मण मोरे (50), तेजस मोरे (15), आनंद मोरे (25) अशी जखमी पोलिसांची नावे आहेत.
अपघाताची माहिती कळताच शिवसेनेचे जिल्हा संघटक नितीन धांडे यांनी जयंत वाघ, शिवराज धांडे, हेमंत वाघ, पंकज धांडे, शाम धांडे, अजिंक्य धांडे, गणेश झुंगरे यांनी घटनास्थळी धाव घेतली. खाजगी वाहनामध्ये त्यांना उपचारासाठी खाजगी रूग्णालयामध्ये दाखल केले. यात तीन पोलीस कर्मचारी आणि चार नागरिक जखमी आहेत.






