प्रियंका गांधींचे आरएसएसवरील ट्विट ठरतेय वादग्रस्त

नवी दिल्ली – उत्तराखंडचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री तिरथ सिंह रावत सध्या एका नव्या वादात सापडले आहे. या मुख्यमंत्र्यांच्या ‘फाटलेल्या जीन्स’बाबतच्या एका वक्तव्यामुळे संपूर्ण भाजप पक्षाला ट्रोल केलं जात आहे. रावत यांच्याबरोबच भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांवर टीका केली जात आगे. देशभरातील महिला नेत्यांनी रावत यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा, शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी, शिवसेना नेत्या आणि अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी रावत यांना ट्विटरवरून लक्ष्य केलं आहे. दरम्यान या वादात आता काँग्रेस महासचिव प्रियांका गांधी वाड्रा यांनी देखील उडी घेतली आहे. त्यांनी उपहासात्मक ट्वीट करत भाजपला लक्ष्य केलं आहे.

तिरथ सिंह रावत यांनी रिप्डजीन्सबाबत केलेल्या वक्तव्यानंतर प्रियांका गांधी यांनी एक ट्वीट केलं आहे. त्यांनी या ट्वीटमध्ये भाजप नेते नितीन गडकरी, सरसंघचालक मोहन भागवत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जुना फोटो शेअर केला आहे. यामध्ये हे तीनही नेते संघाच्या जुन्या गणवेशात आहेत. ज्यावेळी हाफ पँट हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघांच्या गणवेशाचा भाग होता. हा फोटो पोस्ट करत प्रियांका गांधी म्हणाल्या आहेत की, ‘OMG, यांचे गुढगे दिसत आहेत’.

प्रियांका गांधी यांचे हे ट्वीट खूप व्हायरल होते आहे. त्यावर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. मंगळवारी (16 मार्च) बाल अधिकार संरक्षण आयोगच्या एका कार्यशाळेचं उद्घाटन करताना तिरथ रावत सिंह यांनी फाटक्या जीन्सच्या वापरावरून महिलांच्या संस्कारांबाबत भाष्य केले होते. त्यानंतर हा वाद पेटला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here