पान मसालाच्या जाहिरातीमध्ये अजय देवगन सोबत दिसला शाहरुख खान
मुंबई (प्रतिनिधी गणेश तळेकर) – अभिनेता शाहरुख खान हा नुकताच अजय देवगणसोबत पान मसाला ब्रँडच्या एका जाहिरातीमध्ये एकत्र काम करताना दिसले आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे यापूर्वी कधीही शाहरुख खानने अजय देवगणसोबत काम केले नाही. अजय देवगणचा पान मसाला ब्रँडसोबत खूप जूना संबंध आहे. परंतु, समोर आलेल्या या जाहिरातीच्या व्हिडियोमध्ये हे दोन्ही अभिनेते एकत्र प्रमोशन करताना दिसत आहे. त्यामुळे सोशल मीडियावर ट्रोलर्सने शाहरुख खानवर मजेदार मीम्स बनवून त्याला मोठ्या प्रमाणावर ट्रोल करत आहे. हे सर्व मीम्स सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर प्रसारित होत आहे.
Here’s the Vimal Ad featuring Ajay SRK: 😂😭 pic.twitter.com/Z9uLrHptWa
— NISHANT (@NishantADHolic_) March 20, 2021
या जाहिरातीतील व्हिडियोमुळे शाहरुख खान ट्रोलर्सच्या निशाण्यावर आले आहे. सोशल मीडियावर ट्रोलर्सने या पार्श्वभूमीवर वेगवेगळे मजेदार मीम्स तयार करत खिल्ली उडवत आहे. शाहरुख खानच्या ब्रँड टीमने दिव्य मराठीशी बोलतांना या गोष्टीची पुष्ठी दिली की, अभिनेता शाहरुख खानने पान मसाला बँडच्या जाहिरातीमध्ये अजय देवगन सोबत एकत्र काम केले आहे.
Shahrukh Khan also joins the Vimal Ad campaign*#Vimal #SRKians #AjayDevgn
SRK Fans :😂 pic.twitter.com/ZDlNmbytLm— Jatin Trivedi (@JatinTrivedi26) March 20, 2021
एक युजर्स ट्रोल करताना असे लिहले आहे की, “शाहरुख खान पान मसालाचे जाहिरात करीत आहे, जेव्हा आपण तीन वर्षापासून काम करत नाही. त्यामुळे हे असेच घडणार. गुटखा मॅन शाहरुख खान” दुसऱ्याने असे लिहले की, “जेव्हा इंडस्ट्रीमधील दिग्दर्शक आणि निर्मात्याले दोघांना एकत्र आणणे शक्य झाले नाही, तेथे विमलने हे चमत्कार केले.”
After new Vimal tvf,
Ajay devgn be like 😅 : pic.twitter.com/Ob73zrFhl9
— Misha Trends (@Misha__Rajput) March 20, 2021






