मुंबई (प्रतिनिधी गणेश तळेकर) – नवीन गोष्ट,नवा सिनेमा आणि अर्थात स्वतःचे मनोरंजन होईलअशा सिनेमांची निवड प्रेक्षक वर्ग करत असतो आणि म्हणूनच प्रत्येक कलाकार, वाहिनी, ओटिटी प्लॅटफॉर्म्स आदी प्रेक्षकांचे जास्तीत जास्त मनोरंजनकसे होईल याकडे जास्त लक्ष देतो. आणि आता लवकरच प्रेक्षकांना या फेब्रुवारीमहिन्यात घरबसल्या एका नव्या सिनेमाचा आस्वाद घेता येणार आहे आणि तो सिनेमाआहे झी टाॅकिजची प्रस्तुती असलेला ‘गस्त’.

झी टाॅकिजप्रस्तुत ‘गस्त’ या सिनेमात अभिनेत्री मोनालिसा बागल प्रमुखभूमिकेत दिसणार आहे. यामध्ये मोनालिसाने ‘सुजाता’ नावाच्या मुलीची भूमिका साकारली आहे. तिच्यासोबत अभिनेतातानाजी गालगुंडे देखील सिनेमात दिसणार आहे. मोनालिसाचा नवा सिनेमा, या सिनेमाची नवीन जोडी, नवी गोष्ट यामुळे सिनेमाप्रती प्रेक्षकांची उत्सुकता वाढलीआहे आणि त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या प्रतिक्रिया देखील कळवल्याआहेत






