खरदडी येथे बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी

जिंतूर – तालुक्यातील खरदडी या गावात रविवारी 28 मार्च दुपारी 3 च्या सुमारास बिबट्याने शेतकऱ्यावर अचानक हल्ला केल्याने शेतकरी गंभीर जखमी झाला आहे. शेतकऱ्याच्या नातेवाइकांनी जखमी शेतकऱ्यास शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले आहे.

जिंतूर तालुक्यातील खरदडी गावात आज दुपारी 3 वाजेच्या सुमारास भगवान मंच्छी राठोड (32) हे शेतकरी शेतात काम करत असताना अचानक या त्याच्या अंगावर बिबट्याने हला चढवला. आरडाओरडा केला असता परिसरातील शेतकरी मदतीला धावत आल्याने बिबट्याने त्या ठिकाणाहून पळ काढला. मात्र तोपर्यंत घटनास्थळी असलेल्या शेतकरी भगवान राठोड यांच्या पोटावर पाठीवर व छातीवर बिबट्याच्या पायाचे पंजे लागल्याने त्यास जखमी अवस्थेत नातेवाइकांनी शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले आहे.

या पुर्वी जिंतूर तालुक्यातील वाघी परिसरातील वडी या गावात यापूर्वी त्याचा पिल्लू विहिरीत पडल्याने वन विभागाने पिल्लास सुरक्षित ठिकाणी नेल्याने मादी बिबट्या आपल्या पिल्लांच्या शोधात वाघी वडी शेत शिवारात गाय, शेळ्या यांची शिकार करत चक्क रस्त्यावर वाहनासमोर नेहमी दर्शन देत होती. मात्र आता खरदडी या गावात बिबट्याने शेतकऱ्यांस अचानक हल्ला करून जखमी केल्याने वाघीव खरदडी या दोन्ही परिसरातील ग्रामस्थ व शेतकऱ्यांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तत्काळ बिब्ट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here