नवी दिल्ली – येथे भाजप नेत्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. जी.एस बावा असे या नेत्याचे नाव असून ते 58वर्षाचे होते. जी एस बावा हे भाजप नेते असून त्यांनी दक्षिण दिल्लीचे उपाध्यक्षपदही भुषवले आहे.
सोमवारी सायंकाळी सहाच्या सुमारास सुभाष नगरच्या एका तलावाकाठी त्यांचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळला. बावा यांनी घरगुती कारणांमुळे आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
त्यांच्या मृतदेहासोबत कुठलीही चिठ्ठी आढळली नाही. पोलिसांनी त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून पुढील तपास सुरू आहे.






