पंतप्रधानांकडून रश्मी ठाकरे यांच्या प्रकृतीची विचारपूस

मुंबई (उपसंपादक दिलीप दळवी) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना खास फोन करून सौ.रश्मी उद्धव ठाकरे यांच्या प्रकृतीची विचारपूस केली व त्यांना दीर्घ आयुरारोग्य लाभो, अशा शुभेच्छा दिल्या.रश्मी ठाकरे यांना कोरोनाची बाधा झाली असल्याने त्यांच्यावर एच. एन. रिलायन्स रुग्णालयात वैद्यकीय उपचार सुरू आहेत. त्या उपचारांना उत्तम प्रतिसाद देत असून त्यांच्या तब्येतीत झपाटय़ाने सुधारणा होत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

पाच दिवसांपूर्वी त्यांचा कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. काही वैद्यकीय चाचण्यांसाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रश्मी ठाकरे यांच्या आजारपणाचे वृत्त समजताच पंतप्रधान मोदी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला व रश्मी ठाकरे यांच्या आरोग्यासाठी शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here