नवी दिल्ली – फ्रान्सहून चौथ्या टप्प्यात तीन नवी राफेल लढावू विमानं भारतात दाखल झाली आहेत. बुधवारी रात्री उशिरा तीन राफेल विमानं भारताच्या जमिनीवर उतरली. पुढच्या महिन्यात आणखी सात राफेल विमानं भारतात दाखल होणार आहेत.
चौथ्या टप्प्यात राफेल लढावू विमांनांनी फ्रान्सच्या इस्तरेस एअरबेसहून भारतासाठी नॉनस्टॉप उड्डाण घेतलं. या प्रवासादरम्यान यूएई एअरफोर्सच्या टँकर्सनं हवेतच या राफेल विमानांमध्ये इंधन भरलं.ही तीन राफेल विमान भारतात दाखल झाल्यानंतर भारताकडे असलेल्या राफेल विमानांची संख्या १४ वर पोहचलीय. भारतीय हवाईदलानं सोशल मीडियावर तीन राफेल विमानं भारतात दाखल झाल्याची माहिती दिलीय.
The 4th batch of three IAF #Rafales landed on Indian soil after a direct ferry from#IstresAirBase France. pic.twitter.com/Ch36dgptNF
— Indian Air Force (@IAF_MCC) March 31, 2021
‘फ्रान्सच्या इस्तरेस एअरबेसहून थेट उड्डाणाद्वारे तीन राफेल चौथ्या टप्प्यात भारतीय जमिनीवर उतरली आहेत. यूएई एअरफोर्सच्या टँकर्सनं फ्लाईटच्या दरम्यान राफेलमध्ये इंधन भरलं. दोन्ही देशांच्या वायुसेने दरम्यान संबंध दृढ होण्याच्या हे आणखी एक महत्त्वाचं पाऊल आहे. धन्यवाद यूएई एअरफोर्स’ असं भारतीय हवाईदलानं ट्विट केलंय. सोबतच हवाईदलानं राफेलच्या लँडिंगचा एक व्हिडिओही शेअर केला आहे.
Rafales were refueled in-flight by UAE Air Force tankers. This marks yet another milestone in the strong relationship between the two Air Forces.
Thank You UAE AF.@IndembAbuDhabi @Indian_Embassy pic.twitter.com/6gFwh0AnjR— Indian Air Force (@IAF_MCC) March 31, 2021






