मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) – माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाची लक्षणे जाणवू लागल्याने त्यांनी आज गुरुवारी कोरोना चाचणी केली. ही चाचणी पॉझिटिव्ह आली असून ते मुंबईतील निवासस्थानी विलगीकरणात उपचार घेत आहेत.
जयदत्त क्षीरसागर यांना लक्षणे जाणवू लागल्याने त्यांनी तातडीने कोरोना चाचणी केली असता ते लक्षणे नसलेले कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले आहे. यानंतर त्यांनी स्वत:ला मुंबई येथील निवासस्थानी विलगीकरण करून घेतले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
माझ्या संपर्कात आलेल्यानी आपली चाचणी करून घ्यावी तसेच इतरांनीही खबरदारी घेऊन आपली आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी असे आवाहन त्यांनी केले आहे.






