औरंगाबाद (जिल्हा प्रतिनिधी दत्तात्रय मोटे) – बारावी वर्गात शिकत असलेल्या एका सतरा वर्षीय मुलीने सौताडा येथील धबधब्यात उडी मारून आत्महत्या केल्याची घटना आज गुरूवारी सकाळी उघडकीस आली. घटनेची माहिती पाटोदा पोलिसांना मिळताच घटनास्थळी पोलिसांनी धाव घेऊन मृतदेह शवविच्छेदनासाठी पाटोद्याच्या रूग्णालयात दाखल केला.
शुभांगी लक्ष्मण शिंदे (वय 17) ही बारावी वर्गाची मुलगी बुधवारी रात्री अचानक घरातून निघून गेली. रात्री तिचा शोध नातेवाईकांनी घेतला मात्र ती मिळून आली नाही. सकाळी सौताडा येथील धबधब्यात तिचा मृतदेह आढळून आला. तिने रात्रीच वरून उडी मारली होती. त्यात गंभीर जखमी होऊन तिचा मृत्यू झाला. घटनास्थळी पोटोदा पोलीस ठाण्याचे पोलीस कॉ.तांबे यांनी भेट देऊन पंचनामा केला.






