दिया मिर्झा होणार आई; लग्नाआधीच होती गर्भवती

मुंबई (प्रतिनिधी गणेश तळेकर) – बॉलिवूड अभिनेत्री दिया मिर्झा गर्भवती असून ती लवकरच आई होणार आहे. दियाने ही गोड बातमी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून दिली आहे. मालदिवमध्ये सुट्टी एन्जॉय करत असलेल्या दियाने तिथलाच एक फोटो शेअर करत ही बातमी दिली आहे.

दियाने इंस्टाग्रामवर आपला फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, लवकरच अंगाई, गोष्टी, गाणी अशा सगळ्या गोष्टींची सुरुवात होणार आहे. दरम्यान, दिया मिर्झाने 15 फेब्रुवारी 2021 रोजी वैभव रेखीशी सोबत लग्नबंधनात अडकली होती. लग्नाआधीच ती गर्भवती असल्याचेही बोलले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here