कोरोना रुग्णसंख्येचा महाराष्ट्रात विस्फोट; २४ तासात देशात आढळले १ लाखाहून अधिक रुग्ण

मुंबई (प्रतिनिधी संदेश काटकर) – कोरोना रुग्णसंख्या गुणाकारात वाढत आहे. पहिल्या लाटेचा विक्रमही मोडीत निघाला आहे. कोरोनाची आकडेवारी भयानक पद्धतीने वाढते आहे.

पहिल्यांदाच एवढा मोठा आकडा एकाच दिवशी आढळून आला आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत १६ ऑक्टोबर २०२० रोजी सर्वात मोठी आकडेवारी आढळली होती, त्याचा विक्रमही कालच्या आकडेवारीने मोडीत निघाला आहे. गेल्या २४ तासात २१ लाखाच्यावर नागरिकांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.

रविवारी दिवसभरात १ लाखापेक्षा जास्त कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेत एकाला कोरोना झाल्यास संपूर्ण कुटुंबाला कोरोना होत असल्याचे दिसून येत आहे. आणि विशेष म्हणजे रविवारी आढळून आलेल्या कोरोनाग्रस्त रुग्णांमध्ये सर्वाधिक आकडा महाराष्ट्राचा आहे. राज्यात सध्या ४ लाख ३० हजार ५०३ रुग्ण उपचार घेत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here