कर्नाटकमध्ये धर्मांध मुसलमानांकडून मंदिराचे पावित्र्य भंग करणार्या घटनेच्या पार्श्वभूमीवर आवाहन
मुंबई (संपादक सुनिल पाटील) – कर्नाटकातील मंगळुरु येथील कोरगज्जा मंदिरात अतिशय संतापजनक घटना उघडकीस आली. नवाज (मृत), अब्दुल रहीम आणि अब्दुल तौफिक या धर्मांध मुसलमान युवकांनी कोरगज्ज मंदिरातील दानपेटीमध्ये आक्षेपार्ह वस्तू टाकून मंदिराचे पावित्र्य भंग केल्यामुळे केवळ मंगळुरुच नाही, तर देशभरातील हिंदूंमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे. ही एकमात्र घटना नसून अशा अनेक घटना कर्नाटक राज्यात उघड झाल्या आहेत. यामुळे समाजात तेढ पसरवण्याच्या उद्देशाने अशी कृत्ये करणार्यांवर कठोरात कठोर कारवाई झाली नाही, तर प्रशासनाला हिंदूंच्या रोषाला सामोरे जावे लागेल, अशी चेतावनी हिंदु जनजागृती समितीने दिली आहे. या पार्श्वभूमीवर मंदिरांचे पावित्र्यरक्षण व्हावे आणि कोरोना महामारीच्या आपत्काळात कायदा-सुव्यवस्थेवर अधिक ताण येऊ नये म्हणून, देशभरातील हिंदु मंदिरांमध्ये ‘अहिंदूंना आणि देवावर श्रद्धा नसलेल्यांना प्रवेशबंदी करावी’, असे आवाहन देशभरातील मंदिर विश्वस्तांना हिंदु जनजागृती समितीने केले आहे. समितीच्या वतीने ‘राष्ट्रीय मंदिर-संस्कृती रक्षा अभियाना’अंतर्गत याविषयी मोहिम राबवण्यात येणार असून समस्त मंदिर विश्वस्त आणि भक्त यांनी त्यात सहभागी व्हावे, असे आवाहनही समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी केले आहे.
मंगळुरु येथील धर्मांध मुसलमानांनी मंदिरात केलेली कृत्ये ही हिंदूंच्या श्रद्धास्थानांची हेतूतः विटंबना करणारी आहेत. अशी घटना जर मुसलमानांच्या प्रार्थनास्थळांबाबत घडली असती, तर एव्हाना देश पेटला असता; पण हिंदु सहिष्णू असल्याने येथील वातावरण शांत आहे. आता मात्र अशा हिंदुद्वेषी कृत्यांमुळे मंदिरप्रवेशावर निर्बंध घालायलाच हवेत. आम्ही समस्त मंदिर विश्वस्तांना आवाहन करत आहोत की, हिंदु मंदिरांच्या बाहेर ‘अहिंदु आणि अश्रद्ध यांना प्रवेशबंदी आहे’ असा मोठ्या अक्षरांतील फलक लावावा. तसेच त्याचे बळजबरीने उल्लंघन करणार्यांच्या विरोधात पोलीस तक्रार करावी. समिती यासंदर्भात मंदिर विश्वस्तांच्या बैठका घेऊन देशभर जनजागृती करणार आहे.
काय घडले होते कोरगज्ज मंदिरामध्ये ! : कोरगज्ज मंदिरामध्ये काही दिवसांपूर्वी नवाज, अब्दुल आणि तौफिक हे तीन जण गेले, त्यांनी मंदिरातील दानपेटीमध्ये गर्भनिरोधक टाकले. तसेच मृत्यूपूर्वी नवाज या धर्मांधाने अनेकदा या मंदिरामध्ये मलमूत्र विसर्जन केले होते. यानंतर काही दिवसांत नवाजचा रक्ताच्या उलट्या होऊन मृत्यू झाला. नवाजचा मृत्यू ‘देवाचा कोप झाल्यामुळे झाला’ या भीतीने अब्दुल आणि तौफिक यांनी पुजार्यांकडे जाऊन गुन्हा मान्य केला. त्यानंतर पुजार्यांनी खातरजमा केल्यावर पोलिसांना बोलावून या धर्मांधांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. सर्वधर्मसमभावाची बांग देणार्या एकाही मुसलमान नेत्याने याबाबत साधा खेदही व्यक्त केलेला नाही, याकडेही श्री. शिंदे यांनी लक्ष वेधले.






