जळगाव (संपादक सुनिल पाटील) – महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी कोविडच्या पार्श्वभूमीवर रक्तपुरवठ्याचा तुटवडा भासत असल्याने, महाराष्ट्रातील नागरिकांना रक्तदानाचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत शिवसेना बळीरामपेठ शाखा व आझाद क्रीडा सांस्कृतिक मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबिर संपन्न झले.
रविवार दिनांक ४ एप्रिलला सकाळी १० ते ३ या दरम्यान शिवसेना बळीरामपेठ शाखा व आझाद क्रिडा सांस्कृतिक मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ह्या भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते
यावेळी परिसरातील युवकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती देवून रक्तदान केले. यावेळी शिवसेना विभागप्रमुख विपीन पवार, सामाजिक कार्यकर्ते जितु बागरे, जितेदं गवळी, निर्भय पाटील, अक्षय पिगंळे, गजानन परदेशी आदीची उपस्थिती होती. या रक्तदान शिबिराकरिता गोळवलकर रक्तपेढीचे विशेष सहकार्य लाभले.






