सुभाष सातपुतेंचा महाराष्ट्र सन्मान पुरस्कारांने गौरव .

आटपाडी (प्रतिनिधी) – नॅशनल युनियन ऑफ जर्नलिस्टस महाराष्ट्रच्या वतीने भरारी ग्रुप पुणेचे अध्यक्ष सुभाष सातपुते यांना एन.यु.जे.महारास्ट्र सन्मान २०२१ हा पुरस्कार आज कोल्हापूर येथे प्रदान करणेत आला.

आटपाडी तालूक्यातील राजेवाडीचे सुपुत्र व पुणे व मुंबई मध्ये कार्यरत असलेले सुभाष सातपूते अॅड कंपनीचे चेअरमन, उद्योजक सुभाष सातपुते यांनी सामाजीक बांधीलकीच्या भावनेतून पुण्यामध्ये भरारी ग्रुपच्या माध्यमातून गेली १२ वर्षे विविध क्षेत्रात केलेल्या भरीव सामाजिक कार्याची दखल घेवुन संजय घोडावत युनिर्व्हसिटी कोल्हापुरचे कुलगुरु व विश्वस्त मा.श्री.विनायक भोसले यांच्या हस्ते देण्यात आला. सुभाष सातपुते यांनी महाविद्यालयीन युवकांना एकत्रित घेवुन १२ जानेवारी २००८ साली जागतिक युवा दिना निमित्त भरारी ग्रुपची स्थापना करून ग्रुपच्या सुमारे ३०० युवक युवतींच्या माध्यमातून मोठे काम केले आहे.

५ जून २०१७ साली जागतिक पर्यावरण दिनानिमित सुरु केलेल्या एक युवा बारा महिने बारा झाडे हे अभिनव अभियान पुण्यातील विविध टेकडीवर सुरु केले आहे. या अभियानात १०० युवक एकत्रित आले असुन प्रत्येक महिन्याला एक झाड याप्रमाणे आजपर्यंत ७५०० विविध वृक्षाची लागवड करुन ती जोपासली आहेत.५०००० बीजांचे बीजारोपण केले आहे. ह्या अभिनव अशा अभियानाची दखल पर्यावरण मंत्री आदित्यजी ठाकरे यानी घेतली असुन या उपक्रमाचे कौतुक करुन त्यानी भरारी ग्रुपच्या कार्याचे कौतुकही केले आहे.या कार्याबदल त्यांना काही दिवसापूर्वी राज्यस्तरीय वसुंधरा पर्यावरण रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते .

नुकतेच त्यांनी पनवेल तहसील कार्यालयात १ लाख रुपये किंमतीचा शुध्द व थंड पाण्याचा वॉटर फ़िल्टर भेट म्हणून दिला. या अतुलनीय कार्याची दखल घेवुन पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती .त्यांचे राज्यभरातून कौतुक होत आहे. यावेळी महाराष्ट्र राज्य एन.जे.यु च्या अध्यक्षा सौ.शीतल करदेकर, कोल्हापुर महानगरपालिका मुजावर मैडम , कोल्हापुर जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते व जयसिंगपुर डी.वाय.एस.पी. मा. रामेश्वर वैंजने, प्राचार्य गिरी सर इत्यादी मान्यवर उपस्थित होते .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here