आता तरी काळजी घ्या… गुगलने देखील घातला मास्क!

  • डुडलद्वारे केली हटके जनजागृती

नवी दिल्ली – देशासह जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली असली तरी वाढती आकडेवारी चिंतेत भर टाकणारी आहे. कोरोनापासून बचावासाठी सर्वात महत्त्वाची ढाल आहे ती म्हणजे मास्क घालणे आणि सुरक्षित अंतर राखणे. मात्र नागरिकांकडून याकडे सर्रासपणे दुर्लक्ष करण्यात येत आहे.

या पार्श्वभूमीवर गुगलने आज ‘मास्क वापरा, जीव वाचवा’ असा संदेश डुडलच्या माध्यमातून दिला आहे. गुगलच्या प्रत्येक अक्षराला मास्क घालून हटके पद्धतीने जनजागृती करत नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. मास्क घाला, साबण आणि पाण्याने वारंवार हात धुवा किंवा अल्कोहोलयुक्त सॅनिटायझरचा वापर करा, सोशल डिस्टन्सिंग राखा, वारंवार डोळे, नाक किंवा तोंडाला स्पर्श करू नका, शिंकताना किंवा खोकताना तोंडावर रुमाल ठेवा, अस्वस्थ वाटत असेल तर घराबाहेर पडू नका आणि ताप, खोकला किंवा श्वास घेण्यास त्रास होत असेल तर वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या, अशा सूचना डुडलद्वारे देण्यात आल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here