प्रभाग क्र २८ मध्ये वनश्री कॉलोनी येथे आज अँटीजन व आरटीपीसीआर मोफत चाचणी सुरू

नाशिक (प्रतिनिधी तन्मय गांगुर्डे – पाटील) – आज (दि.९) प्रभागामध्ये वनश्री कॉलोनी येथे मोफत अँटीजेन व आरटीपीसीआर चाचणी सुरू करण्यात आली.

या चाचण्यांमुळे परिसरातील लोकांना मोठा दिलासा मिळाला आहे. यामुळे निश्चितच कोरोनाची रुग्णसंख्या कमी होण्यास मदत होईल. आज अशा चाचण्यांची नितांत आवश्यकता आहे, जेणेकरून निदान झालेल्यांना तातडीने विलगिकरणात ठेवता येते आणि कोरोनाची चैन तोडण्यास मदत होते.

यावेळी अनेक नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत चाचणी करण्यासाठी उपस्थिती दर्शविली. त्याप्रसंगी लोकांशी चर्चा केली. सोबत भाजपा सिडको २ अध्यक्ष व पदाधिकारी तसेच सहकारी मित्र देखील उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here