बावधनच्या बगाड यात्रेतील भाविकांसह बंदोबस्तावरील पोलीस बाधित, 61 जणांना कोरोना

सातारा (प्रतिनिधी दिनेश लोंढे) – जिल्हा प्रशासनानं दिलेले आदेश डावलून बगाड यात्रा आयोजित करणं सातारा जिल्ह्यातील बावधन येथील ग्रामस्थांना महागात पडलं आहे. बावधनच्या बगाड यात्रेमध्ये सहभागी झालेले भाविक आणि बंदोबस्तावर असणारे पोलीस असे एकूण 61 जणांना कोरोना संसर्ग झाला आहे. बगाडाला झालेली गर्दी पाहता कोरोना संसर्ग वाढण्याची शक्यता आहे.

सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील बावधन या गावात रंगपंचमीच्या दिवशी बगाड यात्रा प्रशासनाने घालून दिलेले कोरोनाचे नियम‌ डावलुन ग्रामस्थांनी साजरी केली होती. या यात्रेसाठी हजारोंच्या संख्येने नागरिक यात्रेसाठी एकत्र आले होते.आता यात्रा झाल्यापासून गावात कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागली आहे. आतापर्यंत 61 लोक कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहेत. बावधन गावाच्या आजूबाजूच्या वाघजाईवाडी,पांढरेचीवाडी, म्हातेकरवाडीमध्ये कोरोनाचा आकडा वाढला आहे.

विशेष म्हणजे बावधनच्या ग्रामीण रुग्णालयातील आरोग्य अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह झाले आहेत. या यात्रेच्या बंदोबस्तात असणारे 8 पोलीस कर्मचारी आणि एक पोलीस उपनिरिक्षक कोरोनाबाधित झाले आहेत. यामुळे वाई तालुक्यात कोरोनाबाधितांचा वाढता आलेख पाहायला मिळत आहे. साताऱ्यातील बावधन गावात काढलेल्या बगाड यात्रेला ग्रामस्थांसह बंदोबस्तावर असणाऱ्या पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. यामुळे कोरोना संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here