कोरोना निर्बंधांमुळे सलून बंद पडल्याने सलून चालकाची आत्महत्या

मुंबई (प्रतिनिधी संदेश काटकर)- कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे सध्या सरकारने कडक निर्बंध लादले आहेत. यामुळे छोटे उद्योग, दुकाने, बंद पडली आहेत. सलून चालकही याला अपवाद नाहीत. सलून चालकांची उपजीविका यामुळे बंद पडली आहे. यामुळे कर्जाचा डोंगर डोक्यावर झाल्याने उस्मानाबाद तालुक्यातील एका सलून चालकाने आत्महत्या केली आहे.

उस्मानाबाद तालुक्यातील सांजा गावातील मनोज झेंडे यांची उपजीविका सलूनमधून मिळणाऱ्या मिळकतीवर चालू होती. मात्र कोरोना निर्बंधांमुळे सलूनदेखील बंद आहेत, त्यामुळे उपजीविकेच्या विवंचनेमुळे त्यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले. त्यांच्या मागे पत्नी , दोन मुले, एकी मुलगी असा परिवार आहे. रोज सलून दुकानाच्या माध्यमातून मिळणाऱ्या कमाईवरच त्यांचा प्रपंच सुरू होता, मात्र करोनामुळे सर्व काही बघडत गेलं, मागील वर्षी देखील असंच होत गेलं. आता कुठे जर संसारची गाडी सुरळीत होत असताना पुन्हा एकदा व्यवसाय बंद करण्याची वेळ निर्णय सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे आल्याने, सर्व काही ठप्प झाले होते. त्यामुळे घरगाडा चालवताना आर्थिक समस्या निर्माण होत होत्या, आधीच डोक्यावर कर्जाचा ओझं अन् आता हाताला काम नसल्याने मनोज झेंडे यांनी अखेर विष प्राशन करून आत्महत्या केली. मनोज झेंडे यांच्या कुटुंबीयांना अर्थिक मदत करावी, असे आवाहन महाराष्ट्र नाभिक महामंडळ उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष लक्ष्मण माने यांनी केले आहे.

आत्महत्या करण्याअगोदर मनोज झेंडे यांनी लिहिलेल्या सुसाइड नोटमध्ये लिहिले आहे की, “मी आत्महत्या करत आहे. माझ्या आत्महत्येला कोणालाही दोषी ठरवू नये. मी माझ्या जीवाला कंटाळून आत्महत्या करत आहे. माझ्या आत्महत्येमुळे माझ्या घरच्यांना त्रास देऊ नये. तसेच माझ्या घरच्या लोकांवर बायको, भावावर कोणतेही आरोप लावू नये, ही माझी कळकळीची विनंती आहे. सरकारने हातावरचे पोट असणाऱ्या सलून दुकानदारांना करोनाचे नियम अटीशर्थी लावून काम करण्याची परवानगी द्यावी अन्यथा नाभिक बांधवांना अर्थिक मदत करावी.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here