दैनिक सामनामधील कर्मचारी बलबहादूर सिंग सेवानिवृत्त

मुंबई (उपसंपादक अशोक सिंग) – येथील दैनिक सामनामध्ये कार्यरत असणारे बलबहादूर सिंग भाटक्षेत्री हे प्रदीर्घ सेवेनंतर आज सेवानिवृत्त झाले. शिवसेना नेते व सामनाचे संपादक खासदार संजय राऊत यांनी सेवानिवृत्तीबद्दल बलबहादूरसिंग यांचा सत्कार केला.

बलबहादूर सिंग हे १९८९ मध्ये सामनात नोकरीस लागले. त्यांच्या निगर्वी व विनयशील स्वभावामुळे अल्पावधीतच ते कर्मचारी प्रिय झाले. बलबहादूर सिंग आज आपल्या ३२ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेतून सेवानिवृत्त झाले आहेत.

कर्मचाऱ्यांतर्फे यानिमित्त त्यांचा हृदय सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात खास उपस्थिती देवून कार्यकारी संपादक संजय राऊत यांनीही बलबहादूर सिंग यांचा खास निरोप समारंभ करुन त्यांना भावी आयुष्याकरिता शुभेच्छा दिल्यात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here