उपमुख्यमंत्री अजित पवारांनी किराणा खरेदीसाठी दिलेली वेळ बदलली

ajit-pawar

मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) – राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. दिवसेंदिवस कोरोनाची आकडेवारीही वाढत आहे. राज्य सरकारने 15 दिवसांचा लॉकडाऊन करण्याच्या सूचना दिल्या. यामध्ये काही घटकांना सूट दिली होती. या घटकांमध्ये किराणा मालाच्या दुकानामध्ये गर्दी होताना दिसली. याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी किराणा मालाच्या दुकानाची वेळ बदलली आहे.

किराणा खरेदीच्या नावावर नागरिक दिवसभर बाहेर फिरत असल्याने किराणा दुकानांची वेळ सकाळी सात ते अकरा वाजेपर्यंत मर्यादित ठेवण्याचा निर्णयही उपमुख्यंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सोमवारी घेण्यात आला आहे. त्यासोबतच या बैठकीत इतर मुद्द्यांवरही चर्चा झाली.

राज्यातील रुग्णालयांमध्ये आरोग्य सुविधा वाढवणं, ऑक्सिजन पुरवठा सुरळीत ठेवणं, डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या अडचणी दूर करण आदी विषयांचा आढावा घेण्यासाठी अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी बैठकीचे आयोजन करण्यात आलं होतं.

दरम्यान, राज्यात रेमिडिसिव्हीर इंजेक्शन उपलब्ध होण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत. देशातील प्रमुख सात रेमिडिसिव्हीर निर्मात्या कंपन्यांशी खरेदीसाठी चर्चा सुरु आहे. केंद्र सरकारलाही यासंदर्भात विनंती करण्यात आली आहे. रेमिडिसिव्हिर निर्मात्या कंपन्यांच्या क्षमतावाढीसाठी सहकार्य करण्यात येत आहे. लवकरच राज्याला पुरेसा रेमिडिसिव्हिर साठा उपलब्ध होईल, असा विश्वासही बैठकीत व्यक्त करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here