नवऱ्यासोबत घटस्फोट झाल्यावर ६० वर्षाच्या सासऱ्यासोबत बांधली ‘तिने’ लगीनगाठ!

वॉशिंग्टन – अमेरिकेतील केंटुकीमधील ३१ वर्षीय महिलेने नवऱ्यासोबत घटस्फोट झाल्यानंतर ६० वर्षाच्या सासऱ्यासोबत विवाह केला. हॅरोड्सबर्ग येथील एरिका क्विगने आपल्या सावत्र सासऱ्यांसह लगीनगाठ बांधली. एरिकाच्या पहिल्या लग्नात तिचे सावत्र सासरे आणि सध्याचे पती जेफ क्विगल देखील उपस्थित होते.

स्थानिक कारखान्यात काम करणाऱ्या जस्टिन टॉवेल या युवकासोबत एरिकचा वयाच्या १९ व्या वर्षी विवाह झाला होता. लग्नानंतर या दोघांना एक मुलदेखील झाले. मात्र, वाढत्या वादांमुळे दोघांच्या नात्यांमध्ये २०११ पासून दुरावा येऊ लागला होता. या दरम्यान एरिकाला तिचे सावत्र सासरे जेफ क्विगल यांनी मोठा आधार दिला. वर्ष २०१७ मध्ये एरिका आणि जस्टिन यांच्यात घटस्फोट झाला. त्यानंतर सावत्र सासऱ्याने घटस्फोटीत एरिकाला लग्नाची मागणी घातली. वयांमध्ये २९ वर्षाचे अंतर असूनही दोघे विवाहबद्ध झाले.

लग्नाच्या एका वर्षातच या दोघांना २०१८ मध्ये एक मुलगी झाली. दोन्ही मुलं आईसोबत असतात. वयात अंतर असूनही या जोडप्याने आनंदी असल्याचे सांगितले. एरिकाने सांगितले की, जस्टिनच्या बहिणीच्या माध्यमातून मी जेफ यांना ओळखत होती. त्यांनी मला माझ्या कठीण काळात खूप आधार दिला. त्याच वेळी ही व्यक्ती आयुष्यातील कठीण काळातही मदत करेल असे वाटले होते.

जेफ यांचे वय अधिक असले तरी मनाने ते तरुणच असल्याचे एरिकाने म्हटले. एरिकाचा पहिला पती जस्टिननेही दुसरा विवाह केला आहे. दोन्ही कुटुंबीय जवळपासच वेगवेगळ्या घरात राहतात. जस्टिनने म्हटले की, आम्हा दोघांमध्ये आता सर्व काही चांगले आहे. आता कोणाताही राग, द्वेष मनात नाही. आम्ही आयुष्यात पुढे जाण्याचा निर्णय घेतला असल्याचे जस्टिनने सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here