नवी मुंबई (प्रतिनिधी विरेंद्र म्हात्रे) – महाराष्ट्र शासनाकडुन कोव्हीड-19 चा प्रदुर्भाव रोखण्यासाठी ब्रेक द चेनचे आदेश पारीत करण्यात आलेले असुन कठोर निर्बधित काळात गरीब व गरजु लोकांना हाताला काम नसल्याने गरजवंत लोकांना अन्न – धान्य, जिवनावश्यक वस्तु यांचे वाटप नवी मुंबई पोलीसांकडुन सेवाभावी संस्थांच्या मदतीने सातत्याने करण्यात येत आहे.
सीबीडी पोलीस ठाणे हद्दीतील टाटानगर झोपडपट्टी येथील कूटुंबियांना सीबीडी पोलीस ठाण्याच्यावतीने अन्न धान्य वाटप करण्यात आले.

हा उपकम पोलीस उप आयुक्त, परि-1, वाशी.सुरेश मेंगडे, सहा. पोलीस आयुकत तुर्भे विभाग भरत गाडे, यांच्या उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली तसेच सीबीडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.अनिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली त्याचप्रमाणे कॉन्टीनेन्टल वेअर हाऊसचे अनिमेश विश्वास यांच्या सहकार्याने पार पाडण्यात आला.






