‘तो’ किस करून गेला अन् अर्शी खानला झाला कोरोना?

मुंबई (प्रतिनिधी गणेश तळेकर) – बिग बॉसमधून लोकप्रियता मिळवलेली अर्शी खानला कोरोनाचा संसर्ग झाला आहे. काही दिवसांपूर्वी ती विमानतळावर स्पॉट झाली होती. यावेळीही ती चर्चेत आली होती. विमानतळावर प्रसारमाध्यमांशी बोलताना अचानक तिच्याजवळ एक चाहता आला. आणि त्याने अर्शी खानला फोटो काढण्याची विनंती केली. अर्शीने त्या चाहत्यासोबत फोटो काढला. त्यावेळी त्या चाहत्याने अर्शीच्या हाताला किस केला आणि तेथून निघून गेला. त्यानंतर, अर्शीलाही काही वेळ समजलं नाही की, आपल्यासोबत अचानकपणे काय झालं? पण, दोनचं दिवसांनंतर तिला कोरोनाचा संसर्ग झाला आहे.

चाहत्याच्या या प्रकारानंतर व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. आता अर्शी खानला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. अर्शीला कोरोनाची लागण झाल्याचे तिने स्वतः याविषयीची माहिती तिने सोशल मीडियावर दिली आहे. आता अर्शीला किस केलेला चाहता तो कोरोना रुग्ण होता का? त्याच्यामुळे अर्शीला कोरोनाची लागण झाली, असे तर्कवितर्क लावले जात आहे.

अर्शी खान सध्या घरीच उपचार घेत आहे. दरम्यान, अर्शी लवकरात लवकर कोरोनामुक्त व्हावी, यासाठी चाहते प्रार्थना करत आहेत. अर्शी खानला बिग बॉसमधून प्रसिध्दी मिळाली होती. ती शोमधून बाहेर पडल्यानंतर आपला मेकओव्हर केला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here