अभिनेता बिक्रमजीत कंवरपाल यांचे कोरोनाने निधन

मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) – अभिनेते बिक्रमजीत कंवरपाल यांचे कोरोनाने निधन झाले. चित्रपट निर्माते अशोक पंडित यांनी त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.

त्यांनी ट्विट करत लिहिले, “आज सकाळी कोविडमुळे अभिनेता मेजर बिक्रमजीत कंवरपाल यांचे निधन झाल्याचे ऐकून खूप दु:ख झाले. ते एक सेवानिवृत्त सेना अधिकारी होते. त्यांनी अनेक चित्रपट आणि टीव्ही मालिकांमध्ये सहाय्यक अभिनेते म्हणून भूमिका केल्या होत्या. त्यांची फॅमिली आणि मित्रांच्या प्रति खूप संवेदना.”

भारतीय सैन्यातून सेवानिवृत्त झाल्यानंतर बिक्रमजीत कंवरपाल यांनी 2003 मध्ये अभिनयाची सुरूवात केली होती. त्यांनी पेज 3, रॉकेट सिंह: सेल्समॅन ऑफ द ईयर, आरक्षण, मर्डर 2, 2 स्टेट्स आणि द गाजी अटॅक यासारख्या चित्रपटांमध्ये अभिनय केला होता. तर दीया और बाती हम, ये हैं चाहतें, दिल ही तो है या मालिकांमध्ये काम केलं होतं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here