जिल्हा मध्यवर्ती बँकेत सोशल डिस्टन्सिंगची ऐसी की तैसी

बाजार सावंगी (प्रतिनिधी मुनीर शहा) – येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड कोणतेही नियम पाळण्यात येत नसल्याचे दिसून येत आहे सामाजिक अंतर, चेहर्‍याचा मास्क याबाबत कोणत्याही प्रकारची दक्षता घेत नसल्याचे दिसून आले.

सध्या देशात व राज्यात कोरोनाने हाहाकार माजवला असून, कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाकडून ब्रेक द चेन अंतर्गत प्रयत्न केले जात आहेत. मात्र येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेत यातील कोणतेही नियम पाळले जात नसल्याचेच चित्र दिसून येत आहे. बाजार सांगवी येथील जिल्हा मध्यवर्ती बँके मध्ये खातेदारांची एकच गर्दी उसळत आहे अगोदरच बाजार सांवगीत तालुक्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून बाजार सावंगी करांना मात्र कोरोनाचे भय दिसत नसल्याचे चित्र आहे.

jilha-bank-bajarsavangi

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका देणार खातेदारांना ना सोशल डिस्टन्स ना मास्क अशी परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे या ठिकाणी संसर्ग होण्याची दाट शक्यता व्यक्त होत आहे या गर्दीकडे बँकेचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर लक्ष देण्याची मागणी होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here