बाजार सावंगी (प्रतिनिधी मुनीर शहा) – येथील पोस्टमास्तरची मनमानी काही केल्या थांबत नाही. खातेदारांना वेठीस धरून त्यांना उडवाउडवीची उत्तरे देत त्यांना पायपीट करण्याची व चकरा मारण्याची वेळ आली आहे. मात्र हा पोस्टमास्तर पासबुक प्रिंट करून देण्यास तयार नाही.
पासबुक प्रिंटींग होत नसल्याने खातेदारांना त्यांच्या खात्यात ऑनलाईन किती रक्कम जमा झाली आहे ते पाहता येत नाही व काढताही येत नाही. आज नाही उद्या नाहीतर परवा या अशी अरेरावीची भाषा पोस्टमन सुभाष जयस्वाल या खातेदारांना वापरत आहे.
सद्यस्थितीत या पोस्टात खाजगी पोस्टमनसुध्दा कार्यरत असून, या सब पोस्टमास्तरची व खासगी पोस्टमनची वरिष्ठ व्यवस्थापकांनी तात्काळ चौकशी करून संबंधितांवर कारवाई करून गोरगरीब जनतेला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी परिसरातून होत आहे.






