मॅट्रो मॅन श्रीधरन यांचा काँग्रेसने केला पराभव

पल्लकड (केरळ) – भाजपचे केरळमधील सुप्रसिद्ध उमेदवार इ. श्रीधरन यांचा काँग्रेसचे उमेदवार शफी परमबील यांनी पराभव केला आहे. पलक्कड मतदार संघातून निवडणूक भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवणाऱ्या मॅट्रो मॅन श्रीधरन यांचा ३ हजार ८५९ मतांनी पराभव झाला आहे.

कोचीन भागातील पल्लकल मतदार संघात ६ एप्रिलला मतदान झाले होते. २०१६ च्या विधानसभा निवडणुकीत पलक्कलमधून शफी परमबील यांनी विजय मिळवला होता. त्यावेळी ते भारतीय कम्युनिस्ट पक्षात ( मार्क्सवादी ) होते. यंदाच्या निवडणुकीत भाजपच्या तिकीटावर लढणाऱ्या इ श्रीधरन यांनी प्रस्थापित शफी यांना जोरदार टक्कर दिली. मतदानाच्या पहिल्या १७ फेऱ्यात श्रीधरन आघाडीवर होते. त्यानंतर उत्तरार्धातील मतमोजणी सुरु झाल्यानंतर काँग्रेसचे विद्यमान आमदार शफी परमबील यांनी आघाडी घेतली.

काँग्रेसच्या शफींना ५४ हजार ७९ मते पडली तर इ श्रीधरन यांना ५० हजार २२० मते पडली. शफींनी ३८. ०६ टक्के मते घेतली तर श्रीधरन यांना ३५.३४ टक्के मते मिळाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here