ठाणे येथे उत्कृष्ट कामगिरी केलेल्या कोरोनायोध्दांना सन्मानपत्र वितरण

ठाणे (प्रतिनिधी) – बुलंद पोलीस टाइम्स संहपादक सतीश बनसोडे तसेच, महिला शक्ती फाउंडेशन सौ.शोभना ओवाळ यांच्या मार्फत डॉ. अमोल गीते, अजय सिंह, सिद्धार्थ जाधव, सौ. तृप्ती पाटील, सौ. प्रीती खांणेकर ,सौ कल्याणी भांगरे , गोविंद बने यांच्या प्रमुख उपस्थितीत अत्यावश्यक सेवेतील कोरोना योद्धा परिचारिका, डॉक्टर, नर्स, सफाई, कर्मचारी, पोलीस शिपाई, होमगार्ड कर्मचारी यांच्यासाठी सॅनिटायझर, माक्स, हॅन्ड ग्लोज मोफत वाटप करण्यात येणार आहे

त्याचबरोबर कोरोना कालखंडामध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेल्या कोरोनायोध्दांना सन्मानपत्र देण्यात येणार आहे सदर वाटप दिनांक 14/ 5 /2021 रोजी पत्ता : लोकमान्य नगर पाडा नंबर 4 ठाणे 400606 या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे सर्व तरी सर्व मान्यवर पदाधिकारी सदस्य यांनी सोशल डिस्टन्सचे नियम पाळून उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशन, होमगार्ड संघर्ष समिती ठाणे जिल्हा अध्यक्ष व बुलंद पोलीस टाईम्सचे सहसंपादक सतीश बनसोडे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here