खासदार राजीव सातव यांचं कोरोनानं निधन

पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) – काँग्रेस खासदार राजीव सातव यांचं कोरोनानं निधन झालं आहे. सातव यांच्यावर पुण्यातील जहांगीर रुग्णालयात उपचार सुरू होते. मागील 21 दिवसांपासून ते व्हेंटिलेटरवर होते. मागील 21 दिवसांपासून ते व्हेंटिलेटरवर होते. खासदार राजीव सातव यांना एप्रिल महिन्यात कोरोनाची लागण झाली होती.

राजीव सातव हे कोरोनातून बरे झाल्यानंतर त्यांच्या शरीरात सायटोमॅगीलो हा नवीन व्हायरस आढळला होता.. त्यांच्या शरीरात या विषाणूचा संसर्ग झाला झाल्यानं प्रकृती गंभीर झाली होती. खासदार राजीव सातव यांना एप्रिल महिन्यात कोरोनाची लागण झाली होती. त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे त्यांना पुण्यातील जहांगीर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, नंतर त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत होती तसंच कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्याने ते कोरोनामुक्त झाल्याचं डॉक्टरांनी काही दिवसांपूर्वीच सांगितलं होतं. त्यामुळे लवकरच राजीव सातव यांना रुग्ण्यालयातून डिस्चार्ज मिळण्याची शक्यता होती. पण, अचानक राजीव सातव यांची प्रकृती खालावली होती. सायटोमॅगीलोनं ग्रासल्यानं त्यांचं निधन झालं.

19 एप्रिलपासून राजीव सातव यांना कोरोनाची सौम्य लक्षणं जाणवत होती. 22 तारखेला त्यांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला. 23 एप्रिलपासून पुण्यात जहांगीर हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरु होते. 28 तारखेपासून ते व्हेंटिलेटरवर होते.

राजीव सातव यांना अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे गुजरातच्या प्रभारीपदाची जबाबदारी देण्यात आली होती. तसेच ते काँग्रेसच्या कार्यकारी समितीचे निमंत्रक होते. शिवसेनेचे माजी खासदार सुभाष वानखेडेंना पराभूत करुन राजीव सातव २०१४ मधील लोकसभा निवडणुकीत हिंगोलीतून खासदारपदी निवडून आले होते. राजीव सातव यांच्या मातोश्री रजनी सातव काँग्रेसच्या आमदार होत्या

राजीव सातव यांनी फेब्रुवारी २०१० ते डिसेंबर २०१४ असे चार वर्षे भारतीय युवक काँग्रेसचे अध्यक्षपद भूषवले होते. राजीव सातव यांच्या नेतृत्वात काँग्रेसने सन २०१७ मधील गुजरात विधानसभा निवडणुकीत चांगले यश मिळवले होते.

खासदार राजीव सातव यांनी संसदेत वेळोवेळी मनरेगा, दुष्काळ, शेतकऱ्यांचे प्रश्न, रेल्वे अशा प्रश्नांवर संसदेत आवाज उठवला. त्यांनी संसदेत १,०७५ प्रश्न विचारले होते. तसेच त्यांनी २०५ वादविवादांमध्ये सहभाग घेतला होता. संसदेत त्यांची ८१ टक्के उपस्थिती दाखवली. या कार्याचा गौरव म्हणून त्यांना सलग चार वेळा ‘संसदरत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here