टप्प्याटप्प्याने कांदा विक्रीसाठी आणण्याचे राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या कुबेर जाधव यांचे आवाहन

onion

नाशिक (विशेष प्रतिनिधी) – कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकरी बांधवांनी टप्याटप्याने कांदा विक्रीसाठी आणण्याचे आवाहन, महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संपर्क प्रमुख कुबेर जाधव यांनी केले आहे. खरिपाच्या पेरणीसाठी आर्थिक अडचण येणार असल्याचा पार्श्वभूमीवर कांदा विक्री करण्याची शेतकऱ्यांची मानसिकता आहे.

साठवलेल्या कांद्याची विक्री करण्यासाठी घाई न करता, सहा महिन्यात विक्रीचे नियोजन करुन टप्याटप्याने कांदा विक्रीसाठी आणावा. यामुळे वेळोवेळी चलन उपलब्ध होईल. आगामी काळात साठवणूक केलेल्या कांद्याच्या भावात तेजी रहाण्याची शक्यता असली तरी, लागवडीपासून काढणीपर्यंत अवकाळी पावसाचा तडाखा बसलेला कांदा खराब होण्याची स्थिती देखील शेतकरी बांधवानी लक्षात घेणे आवश्यक आहे.

कोरोना संसर्गाच्या परिस्थितीत गेल्या वर्षभरात समाजातील सर्व घटकांमध्ये प्रामुख्याने शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात ससेहोलपट झाली आहे. कधी बाजार समित्या बंद, तर कधी खत दरवाढ अशा संकटांचा सामना करतांना, शेतकऱ्यांसाठी बंधनकारक करण्यात आलेली, कोरोना चाचणी निगेटिव्ह अहवाल सादर करण्याची अट देखिल जाचक असल्याचे जाधव यांनी सांगितले .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here