प्रख्यात ज्येष्ठ गांधीवादी दोरेस्वामी यांचे निधन

नवी दिल्ली – प्रख्यात गांधीवादी आणि स्वातंत्र्यसैनिक एच. एस. दोरेस्वामी यांचे वयाच्या 103 व्या वर्षी हृदयविकाराने निधन झाले. त्यांनी अलीकडेच करोनावर विजय मिळवला होता.

होरनहल्ली श्रीनिवासैय्या दोरेस्वामी यांचा जन्म 10 एप्रिल 1918 रोजी झाला होता. त्यांनी छोडो भारत आंदोलनात भाग घेऊन 1943-44 मध्ये 14 महिने कारावास भोगला होता.

भारतीय संघराज्यात म्हैसूर संस्थान विलीन करण्यासाठी राबवण्यात आलेल्या म्हैसूर चलो आंदोलनातही ते सहभागी झाले होते. त्यांनी बंगळुरूमधील सेंट्रल महविद्यालयातून बी. एस्सीची पदवी घेतली होती. त्यानंतर ते प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. त्यांनी पौरावानी हे दैनिकही काढले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here