नवी दिल्ली – आपल्या शहीद पतीचं अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्याचा ध्यास एका वीरपत्नीनं घेतलाय. या वीरपत्नीचं नाव निकिता कौल धौंडियाल असं आहे. आपल्या मेहनतीच्या जोरावर येत्या २९ मे रोजी निकिता भारतीय सैन्यात दाखल होणार आहेत.
१४ फेब्रुवारी २०१९ साली काश्मीरच्या पुलवामा भागात केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या ताफ्यावर घडवून आणण्यात आलेल्या आत्मघातकी हल्ल्यात ४० जवानांनी प्राण गमावला होता. त्यानंतर अवघ्या काही दिवसांनी (१८ फेब्रुवारी २०१९) रोजी याच भागातील पिंगलिना गावात दहशतवाद्यांसोबत झालेल्या एका चकमकीत मेजर विभूती शंकर धौंडियाल शहीद झाले होते.
#NationAlwaysFirst. Maj Vibhuti Dhoundiyal, SC made the #SupremeSacrifice on 18 Feb 19 at #Pulwama. His wife Ms Nitika Kaul Dhoundiyal has cleared the Short Service Commission exam & SSB. Now awaits the merit list. #ChinarCorps salutes the brave lady for her great courage. pic.twitter.com/jIfdClVipt
— Chinar Corps🍁 – Indian Army (@ChinarcorpsIA) February 20, 2020
ते ‘५५ राष्ट्रीय रायफल्स’चा एक भाग होते. ३४ वर्षीय शहीद मेजर विभूती यांचा मरणोत्तर शौर्य चक्र पुरस्कारानं सन्मान करण्यात आला. निकिता कौल धौंडियाल या शहीद मेजर विभूती यांच्या पत्नी आहेत.पतीच्या मृत्यूनंतर फेब्रुवारी २०२० मध्ये निकिता यांनी शॉर्ट सिलेक्शन कमिशन परिक्षा आणि मुलाखत पास केल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर चेन्नईत ‘ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी’मध्ये त्यांनी प्रशिक्षण पूर्ण केलं. आता, २९ मे रोजी त्या भारतीय सैन्यात लेफ्टनंट पदावर रुजू होणार आहेत.






