महिला रिक्षा चालक व ऑर्केस्ट्रा कलाकार यांना मोफत अन्नधान्य किट व अन्नदान

ठाणे (उपसंपादक सतीश बनसोडे) – महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशन, पोलिस गृहरक्षक संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य, समस्त महाजन भोजन रथ, जेपी ग्रुप ऑफ ठाणे, यांच्या संयुक्त विद्यमाने जेपी गुरुदेव यांच्या प्रेरणेने ठाणे महानगरपालिका उपमहापौर सौ पल्लवी कदम, बाळासाहेब पाटील (आयपीएस) पोलीस उपायुक्त वाहतूक शाखा ठाणे मुख्यालय यांच्या प्रमुख उपस्थित अत्यावश्यक सेवेतील महिला रिक्षा चालक व ऑर्केस्ट्रा कलाकार यांना मोफत अन्नधान्याचे किट व रस्त्यावरील बेघर लोकांना गोरगरिबांना, कोरोना कालखंडामध्ये दिवस-रात्र सेवा देणाऱ्या पोलिसांना भोजन अन्नदान करण्यात आले.

thane-grain-distribution

police-boys-associationअत्यावश्यक सेवेतील काम केलेला संस्थेतील कर्मचारी यांना सुद्धा कोरोणा योद्धाने सन्मानित करण्यात आले सदर मोफत अन्नदान व अन्नधान्य किट हे वाहतूक शाखा पोलीस उपायुक्त कार्यालय ठाणे व पायरादेवी मंदिर उपवन येथे आयोजित करण्यात आले होते.

varsha-owhal

satish-bansode-thane

या सर्व कार्यक्रमाचे नियोजन महाराष्ट्र अध्यक्ष मा श्री सिद्धार्थ डी जाधव ,मा श्री धीरज पार्सेकर निवड समिती अध्यक्ष महाराष्ट्र राज्य ,मा श्री अमोल माने मुंबई अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली मा श्री सतीश बनसोडे ठाणे जिल्हा अध्यक्ष, महिला अत्याचार अध्यक्षा सौ शोभना ओवाळ, अबोली महिलारिक्षा अध्यक्षा सौ.सरोज पोटफोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सदस्य- सुरज ओवाळ, हेमंत देशमुख, गुड्डू खान यांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here