गोवंडीतील साठे नगर भागात संकल्प संस्थेतर्फे जागतिक मासिक पाळी दिन साजरा

मुंबई (प्रतिनिधी प्राजक्ता अरुण चव्हाण) – शुक्रवार दिनांक २८ मे २०२१ रोजी गोवंडी विभागातील साठे नगर अगरवाडी, मो रफी नगर शांती नगर, पद्मा नगर वस्तीमध्ये संकल्प संस्था माध्यमातून आणि संकल्प संस्थाचे अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखालील ‘जागतिक मासिक पाळी’ दिनाचे औचित्य साधून किशोरवयीन मुली आणि महिला सोबत साजरा करण्यात आले आहे.

sanitary-pad-distribution
या विभागातील असंघटित क्षेत्रा मधील कामगार, कचरा वेचक आणि रोजंदारी वर काम करणाऱ्या कुटुंबातील किशोरवयीन मुली व्यक्तिगत स्वच्छता आणि महिला बरोबर त्याच्या आरोग्य विषयावर चर्चा सत्र घेण्यात आले.किशोरवयीन मुलीनं बरोबर मनीषा शिंदे आणि महिला बरोबर अरूणा मोरे यांनी चर्चा सत्र घेण्यात आले.

gowandiकार्यक्रमात सहभागी मुलींना आणि महिलांना सेनेटरी पॅड आणि सॅनिटीझरचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमात सविता हेडव्हे, वनिता सावंत यांच्या पुढाकाराने तसेच मनीष नवळे यांनी नियोजन बद्ध कार्यक्रम घेण्यात आले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लता कोडक,नाझमा(राणी) शाह नसरीन शेख मो मकसूद शेख, सरोजा सूर्यवंशी, महम्मद इनामदार यांचे विशेष सहकार्य लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here