कोल्हापूर (पश्चिम महाराष्ट्र उपसंपादक मनोज सोनवले) – हुपरी शहरातील चांदी व्यवसाय लवकरच सुरू करण्याचे आश्वासन कामगार / ग्रामविकास मंत्री ना. हसन मुश्रीफ साहेब यांनी दिले.
हुपरी शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने चांदी व्यवसाय सुरू करण्यासाठी हातकणंगले तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी आमदार राजीव आवळे व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष नानासाहेब गाट यांचेवतीने कोल्हापूर सर्किट हाऊस येथे ना हसन मुश्रीफ यांना निवेदन देण्यात आले. सदर निवेदन स्वीकारून लवकरात लवकर चांदी व्यवसाय सुरू करू असे ना मुश्रीफ यांनी सांगितले.
यावेळी हुपरी शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सुनील गाट, युवक अध्यक्ष पृथ्वीराज गायकवाड, विद्यार्थी अध्यक्ष शिवराज देसाई, भटक्या जमातीचे अध्यक्ष अरविंद खेमलापुरे, अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष अमर कलावंत, कार्याध्यक्ष राजेंद्र पाटील RJP, बाहुबली गाट, दिपक गाट, ललीत नवनाळे आदी उपस्थित होते






