औरंगाबाद (जिल्हा प्रतिनिधी दत्तात्रय मोटे) – जालना शहरातील नवजीवन हॉस्पिटलमध्ये थकित बिलाची मागणीवरून रुग्णाच्या संतप्त झालेल्या नातेवाईकांनी राडा करत दगडफेक करून तोडफोड केली. 30 मे रविवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली.घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.संतप्त नातेवाईकांकडून रुग्णालयाच्या मेडिकलमध्येही तोडफोड करून काचा फोडण्यात आल्या.
नवजीवन हॉस्पिटलच्या कोविड रुग्णालयात एका कोरोनाबाधित रुग्णावर उपचार होते. रुग्णाला सुट्टी झाल्यानंतर हॉस्पिटलकडून रुग्णाला थकित बिलाची मागणी केल्याच्या रागातून नातवाईकांनी तोडफोड करून राडा केला. तसेच मेडिकल आणि हॉस्पिटलच्या काचाही फोडुन हॉस्पिटलमधील दोन कर्मचाऱ्यांना देखील मारहाण केलीय.या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी हॉस्पिटल गाठलं मात्र तोपर्यंत तोडफोड करणारे नातेवाईक पसार झाले होते. परंतु काही वेळा मध्येच पोलिसांनी रितेश चौधरी या इसमाला अटक केली आहे अशी माहिती पोलिस सूत्रांकडून मिळाली आहे.
यावेळी अपर पोलीस अधीक्षक विक्रम देशमुख, पोलीस निरीक्षक संजय देशमुख, पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन, पोलीस निरीक्षक यशवंत जाधव, पोलीस निरीक्षक देविदास शेळके, घटनास्थळी पोलिस फौजफाट्या सह तत्काळ भेट दिली. सदरील हॉस्पिटल हे कोविड हॉस्पिटल आहे येथे कोरोनाचे रुग्ण उपचार घेत आहेत. या दगडफेकीमध्ये एका रुग्णाला दगड लागल्याने त्यास सामान्य वार्डामध्ये हलविण्यात आले. रितेश चौधरी व दोन इसमावर सदर प्रकरणांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला अशी माहिती कदीम जालना पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रशांत महाजन यांनी दिली.






