अँटिलिया स्फोटके प्रकरणी पोलिस निरीक्षक सुनील माने पोलिस दलातून बडतर्फ

मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) – एनआयएच्या अटकेत असलेले पोलीस निरीक्षक सुनील माने यांना अखेर मुंबई पोलिस दलातून बडतर्फ करण्यात आले आहे. ॲंटिलिया स्फोटक आणि मनसुख हिरन हत्याकांडात बडतर्फ झालेले माने हे चौथे पोलिस अधिकारी असून या आधी सचिन वाझे, रियाझुद्दीन काझी, विनायक शिंदे यांना बडतर्फ करण्यात आले आहे. पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी भारतीय संविधानाच्या अनुच्छेद ३११ (२) (बी) अंतर्गत मिळालेल्या विशेषाधिकाराचा वापर करून माने यांना बडतर्फ केले आहे.

ॲंटिलिया स्फोटक प्रकरण उघडकीस आले त्यावेळी सुनिल माने हे गुन्हे शाखा युनिट ८ मध्ये कार्यरत होते. या प्रकरणात त्यांनी वाझेंना मदत केल्याचे समोर येताच त्यांची सशस्त्र विभागात बदली करण्यात आली होती. काही दिवसांनी त्यांचा गुन्ह्यात सहभाग स्पष्ट झाल्यानंतर एनआयएने त्यांना अटक केली. याप्रकणात अटक झालेल्या सर्व चारही पोलिसांवर बडतर्फीची कारवाई करण्यात आली आहे.

सुनील माने हे मुंबईतील कांदिवली क्राइम ब्रँचचे पोलिस निरीक्षक होते. माने यांची दहशतवाद पथकाच्या काळाचौकी युनिटमध्ये चौकशी करण्यात आली. मनसुख हिरन हत्या प्रकरणात अटक झालेले पोलिस निरीक्षक सुनील माने यांना मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या निवासस्थानाबाहेर स्फोटके ठेवण्याच्या प्रकरणाची पूर्वकल्पना होती असा राष्ट्रीय तपास यंत्रणेचा दावा होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here