होमगार्ड अक्षय बामणे, सय्यद शेख यांचा पोलीस गृहरक्षक संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य यांच्या मार्फत सत्कार
ठाणे (उपसंपादक सतीश बनसोडे) – दि.२३/५/२०२१ रोजी होमगार्ड श्री सय्यद बाबू शेख बांद्रा जीआरपी रेल्वे पोलीस स्टेशन येथे कर्तव्य बजावत असताना स्वतःच्या जीवाची पर्वा न करता प्रवासी महिलेच्या लहान मुलाला प्राण वाचवले त्यांनी धाडसी शौर्य केल्याबद्दल डॉ प्रज्ञा सरवदे (आयपीएस) अपर पोलीस महासंचालक लोहमार्ग महाराष्ट्र राज्य मुंबई, कैसर खालिद (आयपीएस) पोलीस आयुक्त लोहमार्ग मुंबई यांनी एक हजार रुपये बक्षीस व प्रशस्तीपत्रक , महाराष्ट्र पोलीस मानचिन्ह देऊन त्यांचा सत्कार गौरव करण्यात आला.
सय्यद शेख होमगार्ड यांच्याप्रमाणेच बोरवली रेल्वे स्टेशन येथे प्रवासी इसम रेल्वेखाली आत्महत्या साठी उडी मारली असताना तेथे कर्तव्यावर ती उपस्थित असलेले अक्षय बामणे होमगार्ड यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आत्महत्या करण्यासाठी उडी मारलेल्या रेल्वे प्रवासी यांचा जीव वाचवण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालून रेल्वे प्रवासी याला जीवदान दिले त्यांनी केलेल्या शौर्याबद्दल दोन्ही होमगार्ड श्री शेख व श्री बामणे यांना महाराष्ट्र पोलीस गृहरक्षक संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य सिद्धार्थ डी जाधव अध्यक्ष महाराष्ट्र राज्य यांच्या मार्गदर्शनाखाली धीरज पार्सेकर निवड समिती अध्यक्ष महाराष्ट्र राज्य ,अमोल माने अध्यक्ष मुंबई, अमोल पटेकर सरचिटणीस मुंबई, विशाल शहा उद्योग जिल्हाध्यक्ष मीरा-भाईंदर, यांच्या प्रमुख उपस्थितीत बोरवली रेल्वे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भास्कर पवार यांच्या हस्ते होमगार्ड श्री शेख , अक्षय अनिल बामणे होमगार्ड यांना पोलिस गृहरक्षक संघर्ष समिती मार्फत फुलगुच्छ शाल-श्रीफळ देऊन छत्रपती शौर्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
हा पुरस्कार मिळाल्यामुळे अनेक सामाजिक संस्था ट्रस्ट कडून त्यांचे कौतुक करण्यात आले व बोरवली पोलीस स्टेशन मधील सर्व पोलीस अधिकारी, पोलीस कर्मचारी , पुरुष ,महिला होमगार्ड यांना कोरोणा योद्धा ने सन्मानित करण्यात आले तसेच स्वतःचा जीव धोक्यात घालून श्री शेख व श्री बामणे होमगार्ड यांनी रेल्वे प्रवाशांचा जीव वाचवल्या बद्दल त्यांना पोलीस भरती मध्ये किंवा सरकारी नोकरी देण्यात यावी याबाबत शिफारस पोलिस गृहरक्षक संघर्ष समिती मार्फत गृहमंत्री व महासमादेशक होमगार्ड महाराष्ट्र राज्य यांना करण्यात आली आहे तसेच अनेक कर्तव्य स्वतःचा जीव धोक्यात घालून प्रामाणिकपणे होमगार्ड करत आहे त्याची राज्य शासनाने दखल घेणे गरजेचे आहे तसेच त्यांचे वेतनाचे प्रश्न सुद्धा खूप प्रलंबित आहे ते सुद्धा शासनाने तात्काळ सोडवावे अनेक ठिकाणी होमगार्ड जखमी किंवा मृत्युमुखी झाल्यास तात्काळ शासनाकडून मदत मिळत नाही ती मदत तात्काळ उपलब्ध करून द्यावी ही मागणी पोलिस गृहरक्षक संघर्ष समिती मार्फत करण्यात आली आहे आहे एखाद्या होमगार्ड किंवा महिला होमगार्ड यांनी चांगल्या प्रकारे कर्तव्य केले असल्यास त्यांना शासनाकडून दहा हजार रुपयाचे बक्षीस जाहीर करावे याबाबत मागणी करण्यात येणार असल्याचे सांगितले.







