गोरेगाव व जोगेश्वरी विधानसभेच्या संयुक्त विद्यमाने आरे चेक नाका गोरेगाव पूर्व येथे उग्र निदर्शने

मुंबई (प्रतिनिधी दिनेश लोंढे) – महाराष्ट्र शासनाने मागासवर्गीय पदोन्नतीत आरक्षण हटवण्याचे परीपत्रक काढून जो निर्णय घेतला आहे त्या विरोधात १जून ते ७ जून पर्यत राज्यभरात आंदोलन करण्याचे आदेश रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदासजी आठवले यांनी दिलेले आहेत.

त्याचप्रमाणे उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री सूश्री बहन मायावतींबद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्या माथेफिरू अभिनेता रणदीप हूड्डा याच्यावर दलित अन्याय अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत कारवाई करून अटक करावी या मागणी केलेली होती याच अनुषंघाने व ना.रामदास आठवले यांच्या आदेशानूसार दिनांक १जून रोजी सकाळी ११ वाजता आरे चेक नाका गोरेगाव पूर्व मुंबई ६३ येथे रिपब्लिकन पक्षाचे मुंबई प्रदेश अध्यक्ष गौतम सोनवणे साहेब यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचा तीव्र शब्दात,निषेध करून उग्र निदर्शने करण्यात आली.

या उग्र निदर्शनात मुंबई प्रदेश महीला आघाडीच्या कार्याध्यक्ष उषाताई रामलू, व मुंबई प्रदेश सचिव आत्माराम बावीस्कर, मुंबई प्रदेश सचिव रमेश जोगदंड, मुंबई प्रदेश उपाध्यक्ष शहाजी सावंत,भगवान धनराज, उत्तर पश्चिम जिल्हा मुंबई अध्यक्षा यूवती आघाडी मा.रेश्मा खान, उ.प.मुंबई जिल्हा उपाध्यक्ष मा.आनंद थोरात व उ.प.जिल्हा सचिव रमेश ए.पाळंदे महीला उपाध्यक्ष मुंबई प्रदेश, नितूताई मोरे, जिल्हा उपाध्यक्ष महीला आघाडी रेखाताई मोरे, उ.प.जिल्हाध्यक्ष मायनाॅरटी विभाग इस्तेकार अहमद(बाबूभाय), जोगेश्वरी विभागातील रिपाई नेते सिद्धार्थ पारेजी व जिल्हा उपाध्यक्ष मायनाॅरटी श्रीदेवी राठोड व जिल्हा उपाध्यक्ष मा.कीरन पवार, महीला आघाडी जोगेश्वरी तालूका उपाध्यक्ष ज्योतीताई जोगदंड, जोगेश्वरी तालूका उपाध्यक्ष मा.प्रविण सावत, वार्ड क्र.७४ अध्यक्ष, जोगेश्वरी तालूका कार्याध्यक्ष इब्राहिम शेख, जोगेश्वरी तालूका उपाध्यक्ष बालाजी जाधव, जोगेश्वरी महीला तालूका अध्यक्ष नंदाताई लहाने शाखा अध्यक्ष,वार्ड क्र.५२ च्या महीला वार्डअध्यक्ष ममताताई तांबे, अजमेर शेख, महीला आघाडीच्या वार्ड क्र.५३च्या अध्यक्षा गवळणताई बालाजी जाधव, शुभांगी जगताप,ज्योती गरूड वयूवक गोरेगाव तालूका अध्यक्ष दिपक स.सहेजराव, उ.भा.आ.तालूका अध्यक्ष संजय यादव,वार्ड क्र.५४ अध्यक्ष लखन प्र.पाईकराव,वार्ड क्र.५६ अध्यक्ष संतोष भोसले, उ.भा.आ.वार्ड अध्यक्ष राकेश कुमार वर्मा,वार्ड क्र.५४ कार्याध्यक्ष राजू कदम,उपाध्यक्ष हनुमान धबाले विजय धबाले वार्ड क्र.५४ सरचिटणीस संतोष वारकरी,यूवा तालूका सहसचिव रवी सहेजराव, गोरेगाव तालूका यूवा संघटक संतोष घायाळ, राहूल नामदेव सहेजराव,भरत प्र.पाईकराव,आदी जोगेश्वरीतील व गोरेगाव मधील पदाधीकारी आणी कार्यकर्त्यांनी कोरोना नियम पाळून सरकारचा निषेध केला व उपरोक्त मागण्यांकडे निदर्शनांच्या माध्यमातून लक्ष वेधले.सदर आंदोलनाचे आयोजन जोगेश्वरी तालूका अध्यक्ष फूलचंद कांबळे व गोरेगाव तालूका अध्यक्ष रमेश वि.पाईकराव यांनी केले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here