फुटबॉलपटू कार्तिक राजेश चौहान उर्फ टायगर याचं कोरोनामुळे निधन

मुंबई – फुटबॉलपटू कार्तिक राजेश चौहान उर्फ टायगर याचं जे जे हॉस्पिटल कंपाउंड़, मुंबई येथे कोरोना मुळे नुकतंच निधन झाले. मृत्यू समयी त्याचे वय २० वर्षे होतं. राज्यस्तरीय तसेच राष्ट्रीय स्तरांवर फुटबॉल खेळात प्रावीण्य मिळवून कार्तिकने आपली एक वेगळी ओळख निर्माण केली होती. त्याच्या खेळाचे अनेकांनी कौतुक देखील केले होते.

कार्तिकच्या अचानक जाण्याने अवघ्या चौहान कुटुंबावर आणि फुटबॉल क्रीडा क्षेत्रांत कमालीची शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्च्यात आई सौ. मिनाक्षी राजेश चौहान, वडील राजेश मणिलाल चौहान, आजोबा मणिलाल चौहान, आजी गीता मणिलाल चौहान, काका रमेश चौहान, छगन चौहान, गिरिधर चौहान, नरेश चौहान, भरत चौहान, चेतन चौहान,काकी आशा चौहान, कपिला चौहान, रंजिता चौहान, पिंकी चौहान, भाऊ तुषार चौहान , क्रीश चौहान, विजय चौहान, निलेश चौहान, मनीष चौहान, प्रेम चौहान, मावशी कांता सोलंकी, मौसा हरीश सोलंकी, मामा सुरेश सोलंकी असा परिवार आहे.kartik-chuvan1kartik

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here