‘फेअर अँड लव्हली’ गर्ल यामी गौतम अडकली विवाहबंधनात

मुंबई (प्रतिनिधी गणेश तळेकर) – मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री यामी गौतम आणि ‘उरी..’ सिनेमाचा दिग्दर्शक आदित्य धर हे एकमेकांच्या आयुष्याचे जोडीदार झाले आहेत. या दोघांनी आपल्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करून त्यांच्या चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. त्यांनी हा फोटो शेअर केल्यानंतर त्यांच्या चाहत्यांनी आणि अनेक कलाकारांनी या दोघांना भावी आयष्यासाठी खूप शुभेच्छा दिल्या आहेत.

यामी आणि आदित्यने सोशल मीडियावर त्यांच्या लग्नातील एक सुंदर फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये यामी आणि आदित्य एकमेकांकडे प्रेमाने बघताना दिसत आहे. यामीने यामीने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर लग्नामधील एक फोटो शेअर केला आहे. लाल रंगाची साडी नेसलेली यामी नववधूच्या वेशात आणि आकर्षक अशा दागिन्यांमध्ये अतिशय सुंदर दिसत आहे. तर नवरदेव आदित्यने क्रीम आणि लाल रंगाची बॉर्डर असलेली शेरवानी परिधान केली आहे. तो देखील खूपच उमदा दिसत आहे.

यामीने हा फोटो शेअर करताना लिहिले आहे की, ‘आमच्या कुटुंबातील सर्व सदस्यांच्या आशिर्वादाने आम्ही लग्नबंधनात अडकलो आहोत. आम्ही सर्वजण खासगीपणा जपणारे असल्याने जवळच्या आणि मोजक्याच लोकांच्या उपस्थितीमध्ये हा लग्न सोहळा पार पाडला आहे… प्रेम आणि मैत्रीपूर्ण नात्याने एका नवीन प्रवासाला सुरुवात केली आहे. आमच्या या प्रवासासाठी तुमच्या शुभेच्छा आणि आशिर्वाद हवे आहेत. तुमचे यामी आणि आदित्य… ’ या दोघांनी लग्नाचा फोटो शेअर केल्यानंतर त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होऊ लागला आहे. तसेच सेलिब्रिटींनीही त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. यामध्ये अभिनेता कार्तिक आर्यन, वाणी कपूर, जॅकलिन फर्नांडिस, वरुण धवन, ताहिरा कश्यप यांचा समावेश आहे.

या दोघांनी लग्न केल्याची बातमी आल्यानंतर त्यांच्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. तसेच ही बातमी ऐकून ते हैराण देखील झाले आहेत. कारण हे दोघेजण लग्न करणार असल्याची पुसटशी शंका देखील कुणाला लागली नव्हती.यामी आणि आदित्यने २०१९मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘उरी : द सर्जिकल स्ट्राईक’ या चित्रपटासाठी एकत्र काम केले होते. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here