गुरुमाता आनंदी माताची पुण्यतिथी साजरी

पेण -सोगावकर – परमानंद आश्रमाच्या गुरुमाता आनंदी मातेची २१ वी पुण्यतिथी ट्रस्ट तर्फे साधेपणाने परमानंद वाडी दादर-पेण येथे सालाबादप्रमाणे कोविड नियमाचे पालन करून साजरी करण्यात आली.

सकाळी ७ ते ८:३० पर्यन्त अभिषेक,तर पारंपरिक भजन व कीर्तन आयोजित न करता दुपारी ट्रस्टचे अध्यक्ष कृष्णकांत पाटील व कार्याध्यक्ष उदय पाटील,सल्लागार ,कार्यकारिणी सदस्य रायगड भूषण जयंपाल पाटील व सरचिटणीस गोरखनाथ पाटील यांच्या हस्ते वडाचे वृक्षरोपण करण्यात आले. तर सायंकाळी आनंदी मातेच्या तसबीरीवर पुष्पवृष्टी व आरती घेण्यात आली.

यासाठी सर्वांनी मास्कचा वापर केला होता.ट्रस्टचे उपाध्यक्ष एकनाथ पाटील,सहसचीव नरेंद्र म्हात्रे,कार्यकरिणी सदस्य सुरेश म्हात्रे,महेंद्र भोईर,सौ.नलिनी पाटील,सुगंधा पाटील,हिरूबाई पाटील आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here