उद्धव ठाकरे हेच पाच वर्षे मुख्यमंत्री ; काँग्रेसचा पूर्ण पाठिंबा – नाना पटोले

मुंबई (उपसंपादक दिलीप दळवी) – काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्रीपदाबाबत केलेल्या वक्तव्यांवरून सुरू झालेल्या उलटसुलट चर्चांना आज त्यांनीच पूर्णविराम दिला. मुख्यमंत्रिपदाबाबत कोणताही फॉर्म्युला ठरलेला नाही. पाच वर्षे उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री राहतील. त्यांना काँग्रेसचा पूर्ण पाठिंबा आहे, असे नाना पटोले यांनी स्पष्ट केले.

नाना पटोले म्हणाले, पंतप्रधान मोदींच्या ‘मन की बात’मध्ये उल्लेख केलेले अकोल्यातील मुरलीधर राऊत यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर ते म्हणाले, शेतकऱयांचा प्रतिनिधी मुख्यमंत्री म्हणून बघायचा आहे. त्याला उत्तर देताना म्हणालो की त्यासाठी काँग्रेस आमदार निवडून दिले पाहिजेत. काँग्रेस हायकमांड ठरवेल कोण मुख्यमंत्री’

शरद पवार यांनी आपले मत सांगितले, तसं मी माझ्या पक्षाचे मत सांगितले. स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा काँग्रेस स्वबळावर लढावे ही जनभावना आहे. मी मन की बात सांगत नाही, असेही नाना पटोले म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here