प्रांतिक सदस्य राष्ट्रवादी काँग्रेस मदनरावजी कारंडे यांचे हस्ते वितरण
इचलकरंजी (क्राइम रिपोर्टर प्रल्हाद चव्हाण) – आजही इचलकरंजी शहरात कोरोना प्रादुर्भाव जास्त आहे. त्यासाठी आय.जी.एम.हॉस्पिटल सक्षम आहे.चांगली सुविधा हॉस्पिटल मार्फत देण्यात येत आहे. तरी आरोग्य साहित्य तुडवडा भासू नये यासाठी उदयसिंग पाटील (बांधकाम सभापती) यांच्या वतीने आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे आरोग्य साहित्य वाटप करण्यात आले.
महाराष्ट्र शासनाकडुन सुरु असलेल्या ऑक्सिजन प्लांटची माहिती घेण्यात आली.युद्धपातळीवर सुरु असलेल्या ऑक्सिजन प्लांटच्या कामाबाबत योग्य त्या सुचना मदन कारंडे यांच्याकडून करण्यात आल्या व आय.जी.एम. हॉस्पिटलमधिल सफाई कर्मचारी यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यांनाही आवश्यक साहित्य देण्याचे सांगितले.
यावेळी नितीन कोकणे (माजी शिक्षण सभापती),प्रधानजी माळी (उद्योजक),बाबुराव जाधव (नाभिक समाज संपर्क प्रमुख), डॉ.महाडिक साहेब,डॉ. खोकरकर,डॉ.प्रदीप माने,स्टोअर प्रमुख श्री. मोरे,संभाजी सूर्यवंशी (आण्णा),अभिजित रवंदे (शहर अध्यक्ष युवक राष्ट्रवादी काँग्रेस), रमेश देशींगे,प्रशांत वासुदेव, खंडू कांबळे, विजय देशींगे, अनिल मुदाळकर, रणजीत शिंगाडे, आकाश पाटील तसेच हॉस्पिटलमधील कर्मचारी उपस्थित होते.






