व्हॉट्सऍपवरील व्हॉईस कॉल करा रेकॉर्ड!

मुंबई – कामानिमित्त आलेले महत्त्वाचे फोन आपण रेकॉर्ड करतो. कोणत्याही स्मार्ट फोनमध्ये हे फिचर सहज उपलब्ध असते. परंतु कधीतरी व्हॉट्सअॅपवरून आलेला महत्त्वाचा व्हॉईस कॉल रेकॉर्ड कसा करायचा, असा प्रश्न आपल्याला पडतो. अजूनतरी व्हॉट्सअॅपने कॉल रेकॉर्डिंग फिचर दिलेले नाही. परंतु सोप्या ट्रिक फॉलो करून तुम्ही व्हॉईस कॉल रेकॉर्ड करू शकता. यासाठी सर्वात प्रथम तुमच्या स्मार्ट फोनमधील प्ले स्टोअरवर जा. त्यानंतर कॉल रेकॉर्डर – क्यूब एसीआर हे अॅप इंस्टॉल करा. यात व्हॉट्सअॅप लॉग इन करा. यानंतर या अॅपला आवश्यक ती परमिशन द्या. यानंतर व्हॉट्सअॅपवर जा आणि तुम्हाला ज्या व्यक्तीशी बोलायचे आहे त्याला कॉल करा. यानंतर आपोआप तुमचे व्हॉट्सअॅप कॉल रेकॉर्ड होतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here