यंत्रमाग व्यवसायाच्या समस्यांबाबत चर्चा करण्यासाठी वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख व गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांची बैठक

कोल्हापूर (पश्चिम महाराष्ट्र उपसंपादक मनोज सोनवले) – गत काही वर्षापासून आर्थिक आरिष्टातुन मार्गक्रमण करत असलेल्या यंत्रमाग व्यवसायाच्या प्रलंबित समस्यांबाबत तसेच प्रलंबित मागण्यांबाबत चर्चा करण्यासाठी हायड्रोलिक बंगला, मलबार हिल येथे आज बुधवार दिनांक २३ रोजी राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख व गृहराज्यमंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील यांनी बैठक आयोजीत केली होती.

याबैठकीत २७ एच पी च्या ७५ पैसे सुट च्या सन २०००-२०२१ च्या अर्थसंकल्पात जो निर्णय झालेला होता त्या निर्णयाला मान्यता देण्यात आली व पुढील आठवड्यात कॅबिनेट मध्ये निर्णय घेण्याचे ठरले.

powerloom-association-meeting-with-minister-aslam-shaikh

यावेळी जेष्ठ शिवसेना नगरसेवक रविंद्र माने, जेष्ठ नगरसेवक सागरभाऊ चाळके, जेष्ठ नगरसेवक मदन कारंडे, नगरसेवक राहुलजी खंजिरे, माजी नगरसेवक राजारामजी धारवट, पॉवरलुम असो अध्यक्ष सतिश कोष्टी, बांधकाम सभापती उदयसिंहजी पाटील, युवा नेते अमित गाताडे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here