शिवसेना जिल्हाप्रमुख हेमंत साळुंके; भडणे येथे उपसरपंचपदी जगतसिंग गिरासे यांची निवड
भडणे (प्रतिनिधी) -शिवसेना पक्ष हा विचारांवर चालणारा पक्ष असुन येथे जातीपातीला थारा नाही. जातीपातीला महत्व न देता सर्वांना सोबत घेऊन चालण्याचे सामर्थ्य फक्त शिवसेनेमध्येच आहे, असे विचार शिवसेना जिल्हाप्रमुख हेमंत साळुंके यांची येथे व्यक्त केले. शिंदखेडा तालुक्यातील भडणे गावात ग्रामपंचायत कार्यालयात काल दि. २३ जुन २०२१ रोजी सर्वानुमते उपसरपंचपदी जगतसिंग गिरासे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी ते बोलत होते.
सर्वप्रथम भडणे ग्रामपंचायत कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज व स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमाचे पुजन करुन बैठकीला ग्रामपंचायत सरपंच, ग्रामसेवक, सदस्य, शिवसेना पदाधिकारी व ग्रामस्थांच्या उपस्थितीत सुरुवात करण्यात आली. यात ग्रामपंचायत सदस्यांनी जगतसिंग गिरासे यांच्या नावाची एकमुखाने मागणी केली. हात उंचावून सदस्यांचे मतदान घेण्यात आले. निर्णय अधिकारी म्हणून ग्रामसेवक मंगेश वाघ यांनी काम पाहिले.
यावेळी बोलतांना श्री.साळुंके म्हणाले की, मुख्यमंत्रीपदी मा.उध्दव ठाकरे विराजमान झाले अन लगेच कोविड-19 ची परिस्थिती उद्भवली. यामुळे गावाचा विकासासाठी हवा असणारा निधी मिळाला नाही. त्यामुळे भडणे गावात विकासाचा अनुशेष बाकी आहे. मात्र आता शासनाने कोविडमुक्त गांव करणाऱ्या ग्रामपंचायतीला ५० लाखांचे बक्षिस देण्याची योजना जाहिर केली आहे. भडणे गावात सरपंच, उपसरपंच यांनी गावातील जेष्ठांचे मार्गदर्शन घेऊन कोविड परिस्थिती हाताळल्यास शासनातर्फे ५० लाखांचे बक्षिस भडणे गावाला मिळू शकते. त्या रक्कमेतून गावाचा विकासाचा अनुषेश भरुन काढण्यात मदत होईल. तसेच गावातील प्रश्न सोडवण्यासाठी सर्वांनी एक ध्येयाने एक दिलाने काम करावे असेही श्री.साळुंके यांनी सांगितले.
याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख हेमंत साळुंके, जिल्हासंघटक मंगेश पवार, उपजिल्हासंघटक भाईदास पाटील, विधानसभा संघटक गणेश परदेशी, भडणे गावाचे प्रथम लोकनियुक्त सरपंच तथा शिवसेनेचे तालुकाप्रमुख गिरीश देसले, शहरप्रमुख संतोष देसले, माजी शहरप्रमुख सागर देसले, नंदकिशोर पाटील, अशोक माळी, माजी सरपंच शहाजी देसले, अशोक देसले, आनंदा पाटील, सतीष माळी, माजी उपसरपंच संजय चौधरी, माजी उपसरपंच सुरेखाबाई अशोक माळी, ग्रामसेवक मंगेश वाघ, दत्तु माळी, विक्रम पाटील, नागो पाटील, देवीसिंग गिरासे, कोमलसिंग गिरासे, नितीन पाटील, प्रल्हाद पाटील, भाऊसाहेब ठाकूर, पोपट माळी, नानाभाऊ कोळी, स्वीय सहायक रुपेश मराठे आदी उपस्थित होते.






